Pav Bhaji: रविवारी सुट्टी दिवशी काहीतरी चटपटीत बनवायचा विचार करताय! मग वाट कसली पाहता बनवा Pav Bhaji. चवदार आणि रेस्टॉरंटसारखी पावभाजी घरच्या घरी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी पावभाजी रेसिपी मराठीत, साहित्य, कृती आणि खास टिप्ससह. आपल्या कुटुंबासाठी आजच बनवा!
साहित्य व सामग्री Pav Bhaji
- बटाटे- 3
- फ्लॉवर- 1/2 कप
- ओला मटार- 1/2 कप
- कांदा- 2
- टोमॅटो- 1
- बीट- 1/4 कप
- गाजर- 1/4 कप
- कोथिंबीर- आवडीनुसार
- आलं लसूण पेस्ट- 1 चमचा
- रेड चिली पावडर
- पावभाजी मसाला
- चवीनुसार मीठ
- बटर
- लादी पाव
कृती: (Pav Bhaji Recipe)
कुकरच्या एका डब्यात आख्खे बटाटे व दुसऱ्या डब्यात बारीक चिरलेला फ्लॉवर, ढोबळी मिरची,ओला मटार, बारीक खिसून घेतलेले बीट व गाजर, थोडेसे मीठ व गरजेनुसार पाणी टाकून कुकर चे टोपण लावून कुकर बंद करावा व कुकरच्या मंद आचेवर तीन ते चार शिट्ट्या घ्याव्यात. जेणेकरून बटाटा व बाकीच्या सर्व भाज्या एकजीव होतील इतपत शिजवून घ्याव्यात.
कुकरची थोडी वाफ थंड होऊ द्यावी व नंतर कुकर मधील दोन्ही डब्बे बाहेर काढावेत. बटाट्याची साल काढून मॅश करून घ्यावे सर्व भाज्या एकजीव करून घ्याव्यात व बटाटाही त्यात मिक्स करावा. नंतर कढईमध्ये बटर टाकावे व त्यामध्ये कांदा छान सोनेरी रंग येई पर्यंत सात-आठ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यावा जेणेकरून कांदा करपणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही आलं व लसूण याची पेस्ट व पावभाजी मसाला,रेड चिली पावडर व आपला घरगुती काळा मसाला हे व्यवस्थित प्रमाणात टाकून पाच मिनिटे परतून घ्यावे. त्यातून भाज्यांना हळूहळू तेल सुटू लागेल. त्यानंतर बटाटा व इतर भाज्या मिक्स करून कढईत टाकाव्यात व एक पाच सहा मिनिटं मंद आचेवर परत परतून घ्याव्यात. चवीनुसार मीठ घालावे व व्यवस्थित Pav Bhaji हलवून घ्यावी.
त्याची एक मध्यम कन्सिस्टन्सी येईपर्यंत परतून घ्यावे व वरून बटरचे क्यूब टाकावेत.
पाव भाजण्याची पद्धत-
प्रत्येकाची पाव खाण्याची पद्धत आपापल्या आवडीनुसार वेगवेगळी असते कोणाला पाव नरम आवडतात तर कोणाला कडक आवडतात त्यानुसार आपण पाव भाजून घ्यावे. नेहमी पावभाजीचे पाव हे विकत घेताना नरम व ताजे फ्रेश असलेले घ्यावेत जेणेकरून आपल्या पोटाला काही त्रास होता कामा नये.
प्रथम पाव हे चाकूच्या साह्याने समप्रमाणात कापून घ्यावे. नंतर पॅन वरती थोडेसे बटर टाकून किंवा पावाच्या दोन्ही बाजूस आतील व बाहेरील बटर लावून ते पॅनवरती दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्यावेत. पाव भाजत असताना ते मंद आचेवरती भाजावेत जेणेकरून पाव करपले जाणार नाहीत व त्याचा करपट वास येणार नाही याची काळजी घ्यावी. आवडीनुसार पाव प्लेन किंवा मसाला लावून भाजून घेऊ शकतो.
जेव्हा तुम्ही पावभाजी(Pav Bhaji) प्लेटमध्ये द्याल तेव्हा आवडीनुसार भाजीच्या वरून बटर घालू शकता व बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व लिंबू पिळून चवदार पावभाजीचा (Pav Bhaji)आस्वाद घेऊ शकता.
Frequently Asked Question for Pav Bhaji Recipe (FAQ)
पावभाजी कोणत्या भाज्यांपासून बनवली जाते?
पावभाजी बनवण्यासाठी मुख्यतः बटाटा, फ्लॉवर, मटर, गाजर, टोमॅटो आणि कांद्याचा वापर केला जातो. तुम्ही इतर भाज्या देखील वापरू शकता.
घरच्या घरी पावभाजी रेस्टॉरंटसारखी चविष्ट कशी बनवावी?
चवदार पावभाजीसाठी योग्य प्रमाणात पावभाजी मसाला, बटर, आणि ताज्या भाज्या वापरणे महत्त्वाचे आहे. मसाला चांगला परतून घ्यावा.
पावभाजी मसाला कसा तयार करावा?
पावभाजी मसाला बाजारात सहज उपलब्ध असतो. घरी बनवण्यासाठी जिरे, धने, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि आमचूर पावडर मिक्स करून वापरता येईल.
पावभाजीला कोणते साइड डिशेस सर्व्ह करू शकतो?
पावभाजीसोबत बटर लावून भाजलेले पाव, कापलेला कांदा, लिंबाचा रस, आणि चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी दिली जाते.
पावभाजी बनवण्यासाठी कोणते तेल वापरावे?
पावभाजी बनवण्यासाठी जास्त करून बटर वापरले जाते, पण हलक्या चवीसाठी तुम्ही तेल वापरू शकता.
पावभाजी बनवताना कोणते मसाले महत्त्वाचे आहेत?
पावभाजी मसाला, तिखट, हळद, आले-लसूण पेस्ट हे मसाले पावभाजीला खास चव देतात.
पावभाजी बनवताना कोणत्या भाज्या आवर्जून वापराव्यात?
बटाटा, फ्लॉवर, मटर, आणि टोमॅटो या भाज्या पावभाजीच्या चवीसाठी महत्त्वाच्या असतात.
पावभाजीला अधिक तिखट कशी बनवावी?
जास्त तिखट पावभाजी हवी असल्यास लाल तिखट आणि तिखट पावभाजी मसाल्याचे प्रमाण वाढवा.
पावभाजी किती वेळात तयार होते?
पावभाजी साधारणपणे ३०-४० मिनिटांत तयार होऊ शकते. भाज्या शिजवण्यास लागणारा वेळ मुख्यतः यावर अवलंबून असतो.
पावभाजीसाठी कोणते पाव वापरले जातात?
पावभाजीसाठी सॉफ्ट आणि हलके पाव वापरले जातात, जे बटरसोबत कुरकुरीत भाजले जातात.
गणपती स्तोत्र मराठीमध्ये वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/ganpati-stotra-marathi-and-sanskrit/#more-631
हनुमान चालीसा मराठीमध्ये वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/hanuman-chalisa-lyrics-marathi/#more-573
राम रक्षा स्तोत्र मराठीमध्ये वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/ram-raksha-stotra-marathi-lyrics/#more-591