Shree Ganpati Aarati Best 2024|श्री गणपती आरती||

Shree Ganpati Aarati: सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची || ह्या गणेशोत्सवी आपल्या गणरायाचे स्वागत मंगलमय आरतीने करा. बोला गणपती बाप्पा मोरया!|मंगल मूर्ती मोरया! हि गणपतीची संपूर्ण मराठी आरती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Ganpati Aarati
Shree Ganpati Aarati

भगवान गणेशाच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय आरती आहे. या आरतीचे रोजच्या आराधनेत आणि गणेशोत्सवात पठन करा.

Ganpati Aarati
श्री गणेशाय नम:

॥ श्री गणपती आरती ( Shree Ganpati Aarati)॥

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची |

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ||

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |

कंठी झळके माळ मुक्ताफळांची || १ ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती || धृ ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ||

हिरे जडित मुकुट शोभतो बरा |

रुणझुणती नुपूरे चरणी घागरिया || २ ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती || धृ ||

लंबोदर पीतांबर फणीवरवंदना |

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||

दास रामाचा वाट पाहे सदना |

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना || ३ ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती || धृ ||


घालिन लोटांगण आरती

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।

डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।

प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।

भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।

त्वमेव माता च पिता त्वमेव।

त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।

त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।

त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा,

बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।

करोमि यध्य्त सकलं परस्मे,

नारायणायेति समर्पयामि ।।३।।

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।

हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।


श्री हनुमान चालीसा मराठीत वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:https://marathireader.com/hanuman-chalisa-lyrics-marathi/#more-573

रामरक्षा स्तोत्र मराठीत वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://marathireader.com/ram-raksha-stotra-marathi-lyrics/#more-591

Shree Ganesh Aarati Image

Ganpati Aarati Image

आमचा  Shree Ganpati Aarati Best 2024|श्री गणपती आरती|| हा ब्लोग कसा वाटला याबद्दल चा अभिप्राय आम्हाला कमेंट बोक्स मध्ये कमेंट लिहून कळवा.

Funny marathi Ukhane वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathireader.com/funny-marathi-ukhane-for-male-and-female/#more-256