Navratri 2024: देवीची नऊ दिवसांची उपासना, घटस्थापना, विशेष पूजेचे महत्त्व आणि परंपरा जाणून घ्या. नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग आणि त्यांचे महत्व.
Navratri 2024: घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
हिंदू धर्म शास्त्रात नवरात्रीचे (Navratri 2024) विशेष असे महत्त्व आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाते. पितृपक्षानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होते यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करावा. 3 ऑक्टोबर 2024 गुरुवार या दिवशी नवरात्रीला सुरुवात होत आहे.
सकाळी 06: 07 ते 9:30 पर्यंत आपण कलश स्थापन घटस्थापना करू शकतो. त्यानंतर 11:37 मिनिटे ते बारा वाजून 23 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त अतिशय शुभ राहील. आपण दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करू शकतो.
नवरात्रीच्या (Navratri 2024) नऊ दिवसांचे रंग व महत्व:
नवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक खूप महत्त्वाचा सण मानला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे एक विशेष महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २०२४ मध्ये कोणते रंग आहेत जाणून घेऊयात.
नऊ दिवसाच्या काळात दुर्गा मातेची नऊ दिवस नऊ रूपांची पूजा केली जाते व हे नऊ दिवस अत्यंत पवित्र व शुभ असे मानले गेले आहेत. अश्विन महिन्यात येणाऱ्या या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. नवरात्रात दुर्गादेवीची पूजा व उपासना केल्यामुळे शक्ती,ज्ञान,मान-सन्मान, कीर्ती, समाधान, सुख- समृद्धी ,आनंद व धन प्राप्त होते असे म्हटले जाते.
१) पहिला दिवस ३ ऑक्टोबर 2024 (गुरुवार) पिवळा रंग-
पिवळा हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे त्यामुळे त्यामुळे पिवळ्या रंगाचे कापड परिधान केल्यावर केल्यावर व्यक्तीचे मन हे आनंदी व आशादायी होते.
२) दुसरा दिवस ४ ऑक्टोबर 2024 (शुक्रवार) हिरवा रंग-
हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात दर्शवितो असे म्हटले गेले आहे, हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो.
३) तिसरा दिवस 5 ऑक्टोबर 2024 (शनिवार) राखाडी रंग-
राखाडी रंग हा संतुलित विचारांचे प्रतीक आहे.
४) चौथा दिवस 6 ऑक्टोबर 2024 (रविवार) नारंगी रंग-
नारंगी हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मनही उत्साही ठेवतो.
५) पाचवा दिवस 7 ऑक्टोबर 2024 (सोमवार) पांढरा रंग-
पांढरा रंग शांतता आणि सुरक्षितेची भावना देतो.
६) सहावा दिवस 8 ऑक्टोबर 2024 (मंगळवार) लाल रंग-
लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
७) सातवा दिवस 9 ऑक्टोबर 2024 (बुधवार) निळा रंग-
निळा रंग हा सुख-समृद्धी आणि शांतता दर्शवतो.
८) आठवा दिवस 10 ऑक्टोबर 2024 (गुरुवार) गुलाबी रंग-
गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रता दर्शवितो.
९) नववा दिवस 11 ऑक्टोबर 2024 (शुक्रवार) जांभळा रंग-
जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो त्यामुळे जांभळा रंगाचे वापर केल्यामुळे भक्तांना सुख-समृद्धी मिळते.
१०) दहावा दिवस 12 ऑक्टोबर (शनिवार) मोरपंखी रंग-
मोरपंखी हा रंग निळा आणि हिरवा या दोन्ही रंगांचे मिश्रण असल्यामुळे या रंगांचा वापर केल्यामुळे दोन्ही रंगांच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो हा रंग विशिष्ट विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवितो.
नवदुर्गा देवीच्या नऊ रूपांची नावे व त्यांचे महत्व:
नवदुर्गा म्हणजे देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे आहेत. प्रत्येक रूपाचे वेगळे महत्त्व आहे. नवदुर्गांची नावे आणि त्यांच्या बद्दलची माहिती जाणून घेऊ.
शैलपुत्री (Shailaputri) – पर्वतांची कन्या. देवी पार्वतीचे हे पहिले रूप आहे आणि तिला हिमालयाची कन्या म्हणून ओळखले जाते.
ब्रह्मचारिणी (Brahmacharini) – तपस्येची देवी. या रूपात देवीने कठोर तप केले आणि तिच्या तपस्येमुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले आहे.
चंद्रघंटा (Chandraghanta) – ज्याच्या कपाळावर चंद्राकृती घंटा आहे. या रूपात देवीचे स्वरूप शांत आणि युद्धासाठी तयार आहे.
कूष्मांडा (Kushmanda) – विश्वाची निर्माती. असा विश्वास आहे की या रूपात देवीने विश्वाची निर्मिती केली.
स्कंदमाता (Skandamata) – स्कंद (कार्तिकेय) यांची आई. या रूपात देवी आपल्या पुत्रासह पूजली जाते.
कात्यायनी (Katyayani) – योद्धा देवी. ऋषी कात्यायन यांच्या घरात जन्म घेतल्यामुळे त्यांचे नाव कात्यायनी पडले.
कालरात्रि (Kalaratri) – अंधार आणि विनाशाची देवी. हे रूप अत्यंत उग्र आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारे आहे.
महागौरी (Mahagauri) – शुद्धतेची आणि शांतीची देवी. देवीचे हे रूप अत्यंत शांत, पवित्र आणि दयाळू आहे.
सिद्धिदात्री (Siddhidatri) – सर्व सिद्धी देणारी देवी. या रूपात देवी भक्तांना विविध प्रकारच्या सिद्धी (अतिशय शक्ती) प्रदान करते.
हे सर्व रूप नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजले जातात आणि प्रत्येक रूपाचे वेगळे महत्त्व आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
आरती संग्रह वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathireader.com/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-ganpati-aarati-sangrah/#more-620
हनुमान चालीसा मराठीत वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/hanuman-chalisa-lyrics-marathi/#more-573
बेस्ट गुड मोर्निंग मेसेज वाच्ण्य्साठी या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/good-morning-quotes-marathi-shubh-sakal/#more-553
आमचा Navratri 2024 हा ब्लोग कसा वाटला याबद्दल चा अभिप्राय आम्हाला कमेंट बोक्स मध्ये कमेंट लिहून कळवा.