Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana: महाराष्ट्रातील शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होता तो निर्णय राज्यसरकारने अखेर घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ चा जीआर काढण्यात आला आहे.
पावसाळी अधिवेशनात मा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलताना सांगितले होते कि जागतिक हवामान बदल व कमी पाऊस यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेतकऱ्यावर आपत्ती ओढवली आहे. त्यामुळेच त्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ घोषित करत आहोत. त्यालाच राबवण्यासाठी राज्यसरकारकडून शासन निर्णय काढण्यात आला आहे.
‘Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024‘ शासन निर्णय काय आहे?
शेती हा व्यवसाय मुख्यता पावसावर अवलंबून आहे. त्यातच होत असलेले हवामान बदल व त्यामुळे झालेला कमी पाऊस. यामुळे शेतकऱ्यावर आपत्ती ओढवली आहे. अशाच संकटात सापडलेल्या ७.५ HP पर्यंतच्या शेतीपंप (मोटर) ग्राहकांना मदतीचा हात देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ अंमलबजावणीची मान्यता देण्यात आली आहे.
योजनेची पात्रता काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील 7.5 HP पर्यंत मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत.
या योजनेचा कालवधी काय असेल?
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ हि योजना ५ वर्षासाठी आहे.
- एप्रिल २०२४ – मार्च २०२९.
- सदर योजनेचा ३ वर्षानंतर आढावा घेऊन पुढे चालू ठेवण्याबाबत निर्णय होईल.
शासन जीआर वाचण्यासाठी यावर क्लीक करा https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407251258409810.pdf
योजनेची अंमलबजावणी कशी होईल?
7.5 HP पर्यंत शेतीपंप (मोटर) ग्राहकांना एप्रिल २०२४ पासून मोफत वीज मिळेल. शासनास विद्यूत अधिनियम २००३, कलम ६५ अन्वये कोणत्याही ग्राहकाला अथवा ग्राहक वर्गावारीला अनुदान देऊन अनुदानित वीज दर देण्याचे अधिकार दिले आहेत.
सध्या या योजनेसाठी शासन वीजदर सवलत ६९८५ कोटी देत आहे. अधिक वीज दर सवलतीसाठी ७७७५ कोटी द्यावे लागतील. तर हीच सवलत वार्षिक देण्यासाठी १४७६० कोटी वीज महावितरण कंपनीला शासन देईल.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 हि शासनाची योजना राबवण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीकडे आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवशक्यतेनुसार कार्यपद्धती तयार करून तात्काळ अंमलबजावणी चे आदेश शासनाने वीज-महावितरण कंपनी ला दिले आहेत. या योजनेचा त्रैमासिक (३ महिन्याचा ) अहवाल नियमितपणे शासनाला सादर करायचा आहे.
- funny मराठी उखाणे वाचण्यासाठी इथे क्लीक करा. https://marathireader.com/funny-marathi-ukhane-for-male-and-female/
अशाच शेतकऱ्यांसाठी काढलेल्या शासनाच्या योजना
विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन कांदा, उस उत्पादक शेतकऱ्याला खुश करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यापैकीच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024, माझी लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना आहेत.