Marathi Ukhane: मराठी उखाणे आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण घटक असून, परंपरा आणि विनोदाचा अनोखा मिलाप अनुभवण्याची संधी देतात.
लग्नसमारंभ, सणवार आणि आनंदाच्या क्षणांमध्ये उखाण्यांचा समावेश केल्यामुळे वातावरण अधिक आनंददायी आणि उत्साहपूर्ण होते.
नववधूसाठी उखाणे घेण्याचा आग्रह आजही उत्साहाने केला जातो. नवीन घरात पाऊल ठेवताना, तिला उखाणे म्हणण्याची परंपरा उत्सवाचा भाग असते. गृहप्रवेशाच्या वेळी नणंद आणि सासरच्या मंडळींनी तिला थांबवून उखाणे घेण्यास सांगितले जाते, ज्यामुळे वातावरण आनंददायी आणि पारंपरिक बनते.
लग्नसमारंभ, सण आणि गोड क्षणांसाठी खास|Marathi Ukhane
देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,
……नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.
सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता- पिता.
……चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.
जगाचे अंगण, मनाचे वृंदावन.
…….रावांचे नाव हेच माझे भूषण.
सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान.
……चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे Marathi Ukhane – तुमच्यासाठी खास….
वर्तन असावे साधे, वाणी असावी गोड.
……..रावांच्या जीवनाला माझी जोड.
हिन्याला कोंदण सोन्याचे, प्रेमाला कोंदण नात्याचे,
……नाव घेते सर्वांच्या आग्रहाचे.
गुलाब असतो काटेरी, मागेरा असतो सुगंधी,
…….रावांच्या जीवनात मी आहे आनंदी.
इन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असतं पावसात ऊन,
….रावांचे नाव घेते …..ची मी सुन.
Marathi Ukhane: परंपरा आणि हसतखेळत मजा यांचा अनोखा संगम…..
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, … ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, …. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
बालपण गेले आई वडिलांच्या पंखाखाली, तारूण्यात मिळाली मैत्रीची साथ,
संसाराच्या वळणावर मिळाला, ……..रावांचा प्रेमळ हात.
आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा, ….रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा.
चाफा बोलेना, चाफा चालेना, ….च माझ्याशिवाय, पानच हलेना.
गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून, रावांचे नाव घेतेची सून.
संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन, …….रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.
विवाह म्हणजे सुरुवात एका नव जीवनाची …..चे नाव’ घेऊन जाणीव ठेवीन” स्त्री कर्तव्याची.
गुळाची गोडी अन् फुलांचा सुगंध, ….रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद .
शीर्वादाची फुले, वेचावीत वाकून, …..रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.
गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी …..रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात आणि …ची जोडी आहे जबरदस्त.
एकविरा आईच्या देवळात सोन्याचा कळस, ….चं नाव घ्यायला मला नाही आळस.
लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने, … च्या संसारात मी राहते मानाने
संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष, …..रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.
गृह प्रवेश मराठी उखाणे|Gruhpravesh Marathi Ukhane
इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात,
…..रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत.
सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात,
…..रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी,
….रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी.
नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले,
……रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले
लग्नानंतर आर्शीवादासाठी थोरामोठ्यांसमोर वाकले,
………..रावांचे नाव घेत संसारात पाऊल टाकले
नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले,
…..रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.
जमले आहेत सगळेयांच्या दारात,
……रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात.
रुखवतीत ठेवले होते खोबऱ्याचे काप,
….रावांचे नाव घेते ओलांडून नव्या घराचे माप.
नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड,
…….च नाव घेतो, आता तरी वाट सोड.
पूर्ण आरती संग्रह एकाच ठिकाणी वाचण्यासाठीया लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-ganpati-aarati-sangrah/#more-620
संक्रांत स्पेशल मराठी उखाणे|Marathi Ukhane
गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,
….रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या वेळी.
लग्नानंतर आज आहे, आमची पहिली संक्रांत,
… रावांचे नाव घेते, सुख समृद्धी येउदे आमच्या संसारात.
संक्रांतीला देतात हळदीकुंकवाचे वाण,
….रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान
नवीन वर्षातील पहिल्या सणाचा,
मान आहे मकर संक्रांतीचा..
अन् ….रावांच नाव घेते,
आशीर्वाद असावा अखंड सौभाग्याचा.
संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात,
…. रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात.
रस्ता अडवायला, जमल्या सगळ्या बहिणी,
….ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी?
उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल,
….च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल
संसाराच्या वेलीवर येतो मोहोर प्रीतीचा
…चे नाव घेऊन निरोप घेते सर्वांचा.
आमचा Best Marathi Ukhane|नववधू व वरांसाठी सर्वोत्तम मराठी उखाणे हा ब्लोग कसा वाटला याबद्दल चा अभिप्राय आम्हाला कमेंट बोक्स मध्ये कमेंट लिहून कळवा.
Good morning messege मराठीमध्ये वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/good-morning-message-shubh-sakal/#more-789
Funny Marathi Ukhane मराठी मध्ये वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/funny-marathi-ukhane-for-male-and-female/#more-256
शुभ सकाळ संदेश मराठीत वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/good-morning-quotes-marathi-shubh-sakal/#more-553