HSC Result 2025:दहावी व बारावी निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी व दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा या फेब्रुवारी – मार्च 2025 महिन्यात पार पडल्या होत्या. त्यातच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती निकालाची.

कारण दहावी व बारावी हा टप्पा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील प्रमुख टप्पा असतो. करिअरच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाचे बारावीचे वर्ष असते. याच निकालावर पुढच्या शिक्षणाची रूपरेषा हे पालक व विद्यार्थी ठरवत असतात.
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी निकाल कधी लागेल याबद्दल माहिती दिली आहे
बारावीचा निकाल जाहीर कधी होणार ?
दिनांक ०५ मे 2025 रोजी दुपारी ०१:०० वाजता बारावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावी व बारावीचा निकाल ऑनलाईन माध्यमातून जाहीर केला जातो. यंदाही निकाल दुपारी ०१:०० वाजता ऑनलाईन पाहता येईल.
निकाल कुठे पाहू शकता ?
HSC Result 2025 पाहण्यासाठी पुढील अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण बारावीचा निकाल पाहू शकतो
- mahresult.nic.in
- mahahsscboard.in
- mahahsc.in
- results.gov.in
निकाल कसा पाहावा ?
HSC Result 2025 पाहण्यासाठी बोर्डाची अधिकृत वेबसाट mahresult.nic.in टाईप करून त्यावर क्लिक करा.
त्यानंतर HSC Result 2025 लिंक वर क्लिक करा. त्यामध्ये बारावीचा रोल नंबर व आईचे नाव टाकून सबमिट या बटणावर क्लिक करा.
बारावीचा रिझल्ट तुमच्यासमोर उपलब्ध होईल. निकाल पाहून तुम्ही तो निकाल पीडीएफ मध्ये डाउनलोड ही करू शकता व प्रिंटही काढू शकता.
एसएमएस द्वारे Hsc Result 2025 कसा पहावा ?
बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून मेसेज पाठवावा लागेल.
त्याचा फॉरमॅट पुढीलप्रमाणे असेल,
MHHSC<space>Seat Number
वरील दिलेल्या फॉरमॅट प्रमाणे मेसेज टाईप करून 57766 या नंबर वर पाठवून द्यावा.
हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात रिझल्ट तुमच्या मोबाईलवर मेसेज द्वारे मिळेल.
HSC Result 2025 पडताळणी
बारावी पेपर re-valuation प्रक्रिया ही निकालानंतर चालू होते. यामध्ये रिव्होल्यूशन हा विद्यार्थी किंवा तो ज्या शाळेत शिकत आहे ती शाळा करू शकते re-valuation चा रिझल्ट हा जून महिन्यामध्ये जाहीर केला जाईल.
जे विद्यार्थी आपल्याला मिळालेल्या गुणाबद्दल आनंदी नसतील ते री व्हेरिफिकेशन साठी अप्लाय करू शकतात
Re-verification ची प्रक्रिया समजून घ्या
- Re-verification साठी सर्वात पहिले अर्ज ऑनलाईन सादर करावा लागतो.
- या अर्जासाठी प्रथम उत्तर पत्रिकेची छायाप्रत असणे गरजेचे आहे
- छायाप्रत मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक असते.
- तसेच त्याचे शुल्क भरणेही तेवढेच आवश्यक आहे
- अधिक माहिती संबंधित विभाग जे मंडळाकडून घेऊ शकता
- री इव्होल्युशन फी ही प्रत्येक विषयाला 300 rs आहे
- Re-verification रिझल्ट जून मध्ये जाहीर होतो
गुण पडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी प्रोसेस
मंगळवार ०६ मे २०२५ ते मंगळवार २० मे २०२५ पर्यंत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तसेच
त्याचे शुल्क Debit card, Credit card, UPI व Net Banking ने भरता येईल
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची आवश्यकता
बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात कमीत कमी 35 गुण मिळणे आवश्यक आहे.
प्रत्येक विषय हा 100 गुणांचा असतो, त्यामध्ये 80 मार्क थेरी व 20 मार्क प्रॅक्टिकल किंवा इंटरनल असतात. या दोन्ही मध्ये मिळून गुणांची संख्या 35 होणे आवश्यक असते.
marathi ukhane:https://marathireader.com/funny-marathi-ukhane-for-male-and-female/#more-256
बारावी निकालाची ग्रेड कशी असेल?
ग्रेड | मार्क |
DISTINCTION | ७५% व त्याच्या वर |
FIRST DIVISION | ६०% व त्याच्या वर |
SECOND DIVISION | ४५%-५९% |
PASS GRADE | ३५%-४४% |
FAIL | ३५% च्या खाली |
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा लेख वाचा:https://marathireader.com/marriage-anniversary-wishes-in-marathi/#more-280