Funny Marathi Ukhane for Male and Female|मराठी उखाणे 2024|

Funny Marathi Ukhane for Male

Funny Marathi Ukhane for Male and Female: उखाणा हा मराठी संस्कृतीतील वैशिष्टपूर्ण काव्यप्रकार आहे. लग्नविधी, गृहप्रवेश, हळदीकुंकू, मकरसंक्रांत, वटपोर्णिमा अशा कार्यक्रमामध्ये उखाणे घेण्याची परंपरा आहे. त्यातच उखाणे घेताना जेष्ठ व्यक्तींना, वधू-वराला उखाणे घेण्यास सांगितले जाते. ते उखाणे घेत असताना कोणी Funny Marathi Ukhane , विनोदी किंवा गमतीशीर उखाणे घेतात. ज्यामुळे कार्याक्रमातील वातावरण हसते खेळते राहते.

funny marathi ukhane for male and female
image credit-weddingwire.in

चला तर मग आम्ही तुमच्यासाठी अशाच काही funny marathi ukhane for male and female साठी उखाण्यांचा संग्रह घेउन आलो आहोत.

Funny marathi ukhane for male:

funny marathi ukhane for male and female

आमच्या लग्नासाठी, नाही केला कोणी अपोज,

… ला मारतो आज, सगळ्यांसमोर प्रपोज.

मुंबई ते पुणे ३ तासांचं आहे अंतर,

आधी खावून घेतो जरा, ……नावचं बघू नंतर.

बटाटयाच्या भाजीला घातला एकदम टेस्टी मसाला,

…… च नाव माहितेय तरी, मला विचारात कशाला?

I Love burger with extra cheese,

…….रावांचे नाव घेते, Excuse me please.

चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा,

मी लग्नच करत नाही ,

आता सर्व जण बोंबलत बसा.

सिव्हील इंजीनिअर बनायला,

लागले खूप कष्ट,

… च नाव घेतो, सर्वांसमोर स्पष्ट

मटणाचा केला रस्सा

चीकन केले फ्राय,

…भाव देत नाही

कित्ती केले ट्राय.

दिसते इतकी गोड कि, नजर तिच्याकडेच वळते,

…. च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते.

Funny marathi ukhane for male..

तू दुसतेस खूप सुंदर साडीवर,

… तुला बायको बनवून फिरवेन गाडीवर.

एक होती चिऊ

आणि एक होता काऊ,

…. च नाव घेतो ,डोकं नका खाऊ.

नाशिकची द्राक्षे,

नागपूरची संत्री,

… झाली आज माझी गृहमंत्री.

द्राक्षाच्या वेलीला,

त्रिकोणी पान,

… चे नाव घेतो,

ऐका देऊन कान.

तू पुण्याची मिसळ,

मी मुंबईचा वडापाव,

लग्नाला हो म्हणायला,

… ने खाल्ला जास्तच भाव.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन,

… आहे माझी ब्युटी क्वीन.

इंस्टाग्रामच्या बायोला,

टाकले आहे फुडी,

… राव आहेत खूप मुडी.

Funny marathi ukhane for male….

गळ्यात घातली चैन,

डोक्याला लावला टीका,

… ला कोणीतरी सांगा,

घर नाही बघत , दार नाही बघत , कुठे बी घेते मुका.

आल्या आल्या सासूबाई,

पाया पडतो वाकून,

… चे नाव घेतो एक क्वार्टर टाकून.

आज झालं आमचं लग्न,

लग्नात आला होता बॅन्डवाला,

…….चे नाव घेतो,

झुकेगा नाही साला.

funny marathi ukhane for male

केळीचे पान टर टर फाटतं,

… चे नाव घ्यायला लय भारी वाटतं.

रस्त्याला हिंदीत म्हणतात सडक,

माझी……. दिसते एकदम कडक.

लग्न जमल्यापासून रात्रीला लागत नाही डोळा,

……. चे नाव ऐकण्यासाठी कावळ्यासारखे झाले सगळे गोळा.

समुद्राचे पाणी लागते खूप खारे,

… तुझ्यासाठी तोडून आणेन मी चंद्र तारे.

नाव घ्या म्हणून सगळे झाले गोळा,

….. च नाव आहे लाख रुपये तोळा.

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,

… माझी नेहमी घर-कामात दंग.

काळी माती, हिरवे रान,

हृदयात माझ्या …… स्थान.

गालावर खळी, डोळ्यात धुंदी,

… मुळे झाले, आयुष्य सुगंधी.

हँगओवर उतरायला, उपयोगी पडते लिंबू,

— एवढी हॉट असताना, मी कशाला ऑफिस मध्ये थांबू.

गोव्यावरून आणले, खास फेनी आणि काजू,

… पप्पी घ्यायला, मी कशाला लाजू.

बाजारातून घेऊन येतो ताजी ताजी भाजी,

…. शी गुलगुल करायला, मी नेहमीच राजी.

डास चावला कि अंगाला येते खाज,

… चे नाव घेतो तुमच्यासाठी आज.

Funny marathi ukhane for female|मराठी उखाणे:

हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ,

… रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली कि पाठ.

संसार असतो दोघांचा, दोघांनी तो आवरायचा,

मी केला पसारा तर तो, …. रावांनी आवरायचा.

Funny marathi ukhane for male and female

कपाळाच कुंकू, जसा चांदण्याचा ठसा,

….रावांचे नाव घेते, सारे जण बसा.

ओल्या चिंब केसांना टॉवेल द्या पुसायला ,

… चे नाव घेते , पैठणी द्या नेसायला.

सोन्याची अंगठी, चांदीचे पैजण,

… रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजन.

रेशमाच्या शर्ट ला, सोन्याचे बटन,

.. रावांना आवडतं, बकरयाचं मटन.

तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,

… रावांना आवडतात, गरमा-गरम बटाटे वडे.

उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टँन,

तरीपण …. राव आहेत, माझे फँन.

गोरया गोरया मुखड्यावर शोभतो काळा काळा गाँगल,

…. माझ्या प्रेमात झालाय पुरा पागल.

बटाट्याला हिंदी मध्ये म्हणतात आलू,

आमचे … राव दिसतात साधे भोले पण आहेत खूप चालू.

फेसबुक वर झाली ओळख,

इंस्टाग्रामवर प्रेम जुळले,

… आहे किती रिकामटेकडे हे लग्नानंतर कळले.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,

…. रावांनच नाव घेते सोडा माझी वाट.

खडी साखरेची गोडी, अन फुलांचा सुगंध,

……..रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर

…. आहे, माझ्या लाइफ चा सर्वर.

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा,

शोधून सापडणार नाही, …. सारखा हिरा.

नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी,

नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी,

… नाव घेते मी आले सासरी.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,

… चे नाव घेते , तुमच्यासाठी स्पेशल.

Funny marathi ukhane for male and female

खालील सणांसाठी वरील उखाणे वापरू शकता-

अ. क्र.सण
लग्नसोहळा.
वटपौर्णिमा.
मकरसंक्रांत.
बारसे
स्पर्धा