Dussehra 2024: शौर्याची पूजा आणि समृद्धीचा सोहळा

Dussehra 2024: अधर्मावर धर्माचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. हा सण शारदीय नवरात्रीच्या १० व्या दिवशी म्हणजेच दशमीला साजरा केला जातो.

Dussehra 2024
Dussehra 2024

Dussehra (दसरा) सणाचे महत्त्व

‘दसरा’ हा हिंदू संस्कृतीत महत्वाचा सण आहे. हा सण अश्विन शुद्ध दशमीला येतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यानंतर दहावा दिवस म्हणजेच दसरा असतो. ज्याला विजयादशमी असेही म्हणतात, हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा साडेतीन मुहर्तापैकी एक मुहुर्त आहे. दसरा म्हणजेच अधर्मावर धर्माचा विजय. हा दिवस रावणाचा वध करून प्रभू श्रीरामांनी सत्य आणि न्यायाचा विजय साजरा केला होता. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.

दसरा (Dussehra) २०२४ मध्ये कधी आणि कसे साजरा करावा?

या वर्षी दसरा १२ ऑक्टोबर २०२४  रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाचा उत्सव नऊ दिवस चालतो आणि त्याचा शेवट दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याला होतो. देवीची मोठ्या थाटामाटात विसर्जन मिरवणूक काढून दसऱ्याचा सण साजरा केला जातो. याशिवाय, रामलीला आणि रावण दहनाचे खास आयोजन भारतात ठिकठिकाणी होते.

दसऱ्याच्या खास परंपरा

शस्त्रपूजन : शौर्याचे प्रतीक मानून या दिवशी शस्त्रपूजन केले जाते.

सरस्वती पूजन: विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी केले जाते.

Dussehra 2024
Dussehra 2024

आपट्याची पाने देणे: या दिवशी आपट्याचे पान एकमेकांना देऊन सोन्याचा आशीर्वाद दिला जातो.

रावण दहन: अधर्माचा नाश दर्शवण्यासाठी रावणाचा पुतळा जाळून साजरा होतो.

दसऱ्याच्या दिवशी काय करावे?

घरात शांतीसाठी पूजा: देवी दुर्गा आणि श्रीरामाची पूजा करून घरातील सदस्यांचे कल्याण साधावे.

संपूर्ण कुटुंबासोबत सण साजरा: कुटुंबासह उत्सव साजरा करून एकोपा वाढवा.

सरस्वती पूजन कसे करावे?

पूजनासाठी एका दगडी पाटीवर श्री सरस्वतीची चित्र काढावे. कारण असे सांगितले जाते कि गायत्री देवीची पहिली प्रतिमा श्री परशुरामाने पाषाणावर काढली होती. श्रीसरस्वतीची प्रतिमा प्रथम प्रशुरामाने काढली होती. पूजेची जागा स्वच्छ करुन घ्यावी. तेथे पाट मांडून त्यावर लाल कपडा घालावा. पाटावर सरस्वती काढलेली पाटी ठेवावी. जवळच सरस्वती देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यासमोर मुलांची अभ्यासाची पुस्तकं किंवा इतर ज्ञानवर्धक पुस्तकं ठेवावीत. जवळ आपट्याची पाने ठेवावी. देवीच्या नावाने खाली तांदळाची रास करुन त्यावर कुंकुं लावलेला कलश स्थापित करावं. त्याला आजूबाजू आंब्याची पाने लावून मधोमध नारळ ठेवावा. देवीला, सरस्वती चिन्हांवर आणि पुस्तकांवर हळद-कुंकु व्हावं. फुलं अर्पित करावी. उदबत्ती, समयी आणि दिवा लावावा. फळांचा नैवेद्य दाखवावा. ज्ञानरूपी महासागर असलेल्या देवी सरस्वतीची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून देवी सरस्वतीची वंदना करावी.

दसरा २०२४: शुभेच्छा संदेश:

दसरा सणाचा मूळ अर्थ अधर्मावर धर्माचा विजय आहे. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याची प्रथा आहे. चला तर मग पाहु दसऱ्यानिमित्त शुभेच्छा संदेश आपल्या प्रियजनांना कशा प्रकारे देऊ शकतो.

“या दसऱ्याच्या पावन दिवशी तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी, आणि शांतीचा विजय होवो. प्रभू श्रीरामाच्या कृपेने तुम्हाला सुख आणि यश लाभो. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“दसऱ्याच्या पवित्र दिवशी अधर्मावर धर्माचा विजय साजरा करा. या सणाच्या निमित्ताने तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होवो आणि सुखसमृद्धीची सुरुवात होवो. दसऱ्याच्या शुभेच्छा!”

“या दसऱ्याच्या दिवशी रावणासारख्या विघ्नांचा पराभव करून सत्य, निष्ठा, आणि यशाचे सामर्थ्य मिळवा. जीवनात विजय प्राप्त करण्यासाठी दसऱ्याच्या शुभेच्छा!”

“दसऱ्याच्या पवित्र दिवशी तुमच्या कुटुंबाला सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळो. देवाच्या कृपेने प्रत्येक कार्य निर्विघ्न पार पडो. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“दसरा हा फक्त भौतिक विजयच नाही तर आध्यात्मिक विजयाचेही प्रतीक आहे. या दिवशी आध्यात्मिक उन्नती प्राप्त करून मन शुद्ध होवो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“रावण दहनाच्या दिवशी तुमच्या जीवनातील सर्व अशुभ शक्तींचा नाश होवो आणि सत्य, धर्म, आणि विजयाचा वास तुमच्या जीवनात कायम राहो. दसऱ्याच्या शुभेच्छा!”

“या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नवे संकल्प करा आणि नवे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुढे जा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवचैतन्य लाभो. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“तुमच्या कुटुंबात शांती, प्रेम, आणि समृद्धी नांदो. गणपती आणि देवी दुर्गेच्या कृपेने तुमचे घर सदैव आनंदाने भरलेले राहो. दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” Happy Dussehra!!

“या विजयादशमीला आपल्या जीवनात यश, ज्ञान, आणि बुद्धिमत्तेचा विजय प्राप्त करा. आपले सर्व काम निर्विघ्नपणे पूर्ण होवोत. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“या दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत. सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचे बळ तुम्हाला लाभो. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“रावणाचा अंत म्हणजे प्रत्येक विघ्नाचा नाश. या दसऱ्याच्या दिवशी तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होवो आणि सत्याचा विजय साजरा होवो. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“दसऱ्याच्या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात सर्वांगीण प्रगती, सुख आणि समाधान येवो. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि यश तुमच्या पावलांशी येवो. दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“विजयादशमीच्या दिवशी नवीन संकल्प करून यशाच्या मार्गावर वाटचाल करा. तुमचे प्रत्येक कार्य यशस्वी होवो आणि तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदमय होवो. दसऱ्याच्या शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“या पावन दिवशी सत्य आणि निष्ठेचा विजय होवो. रावणासारख्या दुष्ट प्रवृत्तींचा अंत होवो आणि जीवनात प्रेम, शांती, आणि निष्ठा पसरवली जावो. विजयादशमीच्या शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“दसरा म्हणजे शौर्याचा आणि समृद्धीचा सण. यंदाच्या दसऱ्याला तुमच्या जीवनात शौर्य, विजय, आणि सुख-समृद्धी लाभो. विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“दसरा हा संकल्प आणि समर्पणाचा सण आहे. आजच्या दिवसाने आपल्या जीवनात सकारात्मकतेची लाट येवो आणि प्रत्येक कृतीत समर्पण भाव टिकवून ठेवा. दसऱ्याच्या शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“या विजयादशमीला सुख, समृद्धी, आणि शांतीचे बीज आपल्या जीवनात रुजवूया. गणपती बाप्पांच्या आणि देवी दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आनंदाने नांदो. विजयादशमीच्या शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळवूया आणि आपल्या जीवनात नेहमीच सत्याचा विजय साजरा करूया. या दसऱ्याला तुमच्या जीवनात विजय, शांती आणि समाधान लाभो. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

“या दसऱ्याला तुमच्या जीवनात आनंद, उत्साह, आणि नवीन सुरुवात होवो. प्रत्येक प्रयत्नात यश मिळवा आणि तुमचे भविष्य उज्ज्वल होवो. विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!”

Happy Dussehra!!

Happy Dussehra!!

राम रक्षा स्तोत्र मराठीत वाचण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/ram-raksha-stotra-marathi-lyrics/#more-591

हनुमान चाळीस मराठीत वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/hanuman-chalisa-lyrics-marathi/#more-573

घटस्थापनेचे महत्वजाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा; https://marathireader.com/navratri-2024-ghatsthapana-navratri-colors/#more-654