CIBIL Score म्हणजे काय? 750+ CIBIL Score कमी व्याजदरावर कर्ज घेण्यासाठी कसा महत्वाचा ठरेल! जाणून घ्या 300 ते 900 पर्यंतच्या स्कोरची महत्त्वाची माहिती आणि 750 पेक्षा जास्त स्कोर कसा मिळवायचा.
CIBIL Score म्हणजे काय?
सिबिल (Credit Information Bureau India Limited ) ही एक कंपनी आहे. जी क्रेडिट ची माहिती देते. सिबिल स्कोर हा आर्थिक देवाण-घेवाणीवर आधारित असतो. जसे की कर्जफेड, क्रेडिट कार्ड, बिल भरणे किंवा इतर वित्तीय जबाबदाऱ्या पार पाडणे. सिबिल ही कंपनी वेळोवेळी व्यक्ती आणि कंपन्यांचा आर्थिक डेटा कलेक्ट करून तिचा रेकॉर्ड ठेवते. क्रेडिट स्कोर म्हणून ओळखला जाणारा सिबिल स्कोर व्यक्तीच्या क्रेडिट पात्रतेची माहिती देतो.
सिबिल सिबिल स्कोर वरून व्यक्तीच्या कर्ज परतफेडीची क्षमता, कर्जाचे व्यवस्थापन किती चांगले आहे हे समजून घेण्यास कर्जदारांना किंवा बँकांना मदत करते.सिबिल स्कोर हा तीन अंकी क्रमांक असतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 पर्यंत असतो. सिबिल स्कोर हा 750 व 750 च्या वर चांगला मानला जातो. High CIBIL आर्थिक क्षमता दर्शवतो. जे की, कर्ज मिळवण्यासाठी किंवा कमी व्याजदरावर फायनान्स मिळवण्यासाठी मदत होते.
CIBIL Score चे महत्व काय आहे?
सिबिल स्कोरवर तुमची आर्थिक विश्वासार्हता कळते. पुढील कारणांसाठी तो महत्त्वाचा ठरतो.
कर्ज पात्रता- बँका आणि वित्तीय संस्था सिबिल स्कोर पाहूनच कर्ज देतात. च्नागाला सिबिल स्कोर म्हणजे कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
कमी व्याजदर- सिबिल स्कोर चांगला असेल तर, कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याची शक्यता असते. ज्यामुळे लॉन्ग टर्म बरेच पैसे वाचू शकतात.
क्रेडिट कार्ड मंजुरी- स्कोर चांगला असेल तर क्रेडिट कार्ड ही मिळवणे सोपे होते व क्रेडिट लिमिट जास्त मिळते.
गृह कर्ज- या कर्जासाठी CIBIL Score महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये बऱ्याच वेळा कमी सिबिल स्कोर मुळे कर्ज नाकारले जाऊ शकते किंवा जास्त व्याजदरावर कर्ज मिळते.
सिबिल स्कोर कसा चेक करायचा?
CIBIL Score चेक करण्यासाठी एक सोपी प्रोसेस आहे. यामध्ये तुम्ही सिबिल स्कोर चे अधिकृत वेबसाईट वापरून पुढील माहिती देऊन तुम्ही तुमचा स्कोर तपासू शकता.
- पॅन कार्ड नंबर
- संपूर्ण नाव
- जन्मतारीख
- ई-मेल आणि मोबाईल नंबर
तसेच अजून बऱ्याच पद्धतीने आपण आपला सिबिल स्कोर चेक करू शकतो. जसे की आपल्या वापरात असणारे फोन पे, जी पे यामध्येही सिबिल स्कोर चेक चा ऑप्शन अवेलेबल आहे.
SSD म्हणजे काय? जाणून घ्या ssd चा वापर करून laptopस्पीड कसा वाढेल:https://marathireader.com/ssd-meaning-in-marathi-ssd-and-hdd-information/#more-728
सिबिल स्कोर कसा वाढवायचा?
- कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे- सर्व प्रकारच्या कर्जांचे हप्ते व क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरल्यास CIBIL Score वाढतो.
- क्रेडिट कार्डचा योग्य वापर- क्रेडिट कार्ड लिमिट 32- 40% पेक्षा कमी वापरणे योग्य आहे. अधिक वापरामुळे CIBIL Score डाउन होतो.
- जुने कर्ज फेडणे- जुने कर्ज लवकरात लवकर फेडणे. कर्ज फेडण्यास विलंब झाल्यास CIBIL Score डाउन होतो.
- नवीन कर्ज विनाकारण घेणे टाळा- अधिक नवीन कर्जासाठी अर्ज केल्यास क्रेडिट स्कोर वर नकारात्मक परिणाम होतो.
- क्रेडिट मिक्स ठेवा- वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि क्रेडिट कार्ड एकत्रित वापरण्याने क्रेडिट मिक्स वाढतो. ज्यामुळे CIBIL Score वाढतो.
सिबिल स्कोर किती वर्षापर्यंत टिकतो?
सिव्हिल स्कोर दीर्घकाळपर्यंत चांगला राहण्यासाठी तुम्ही नियमितपणे कर्जाचे हप्ते भरणे आणि योग्य प्रकारे क्रेडिट कार्ड वापरणे गरजेचे असते. काही लोकांचा सिव्हिल स्कोर हा ५ ते १० वर्षापर्यंत चांगला राहतो, परंतु त्यासाठी त्याप्रमाणेच शिस्तबद्ध आर्थिक वागणूक महत्त्वाचे असते.
सिबिल स्कोर (CIBIL Score) ची तपासणी का महत्वाची आहे?
चुकीच्या माहितीमुळे तुमचा सिव्हिल स्कोर कमी होऊ शकतो, जसे की जर एखाद्या कर्जदाराने चुकीची माहिती नोंदवली तर तुमचच्या क्रेडिट रिपोर्टवर चूक होऊ शकते. त्यासाठीच दर ६ महिन्यांनी सिविल स्कोर तपासणी गरजेचे आहे.
सिबिल स्कोर (CIBIL Score) मध्ये सुधारणा करण्यासाठी काही टिप्स
- थकबाकी असलेले कर्ज व क्रेडिट कार्डचे बिल त्वरित फेडणे.
- क्रेडिट कार्डचा लिमिटेड वापर.
- कर्ज आणि क्रेडिट कार्ड एकत्रित वापरा.
- नवीन कर्ज घेताना तुमची आर्थिक स्थिती तपासा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Question):
1 सिबिल स्कोअरचा अर्थ काय आहे? cibil हि एक कंपनी आहे जी प्रत्येकाच्या आर्थिक इतिहासाची नोंद ठेवते. त्यावरून त्या व्यक्तीच्या सिबील स्कॉर ठरवते. सिबिल स्कॉर वरून कर्ज परतफेडीची आर्थिक स्थिती समजते. याचा वापर करून बँक कर्ज देण्यासाठी मदत घेतात. सिबिल चांगला असेल तर कर्ज लवकर व कमी व्याजदरावर मिळते.
२ सिबिल स्कोर किती असावा? सिबिल स्कोर ३ अंकी नंबर असतो, जो ३००-९०० मध्ये असतो. ७०० च्या वर सिबील स्कोर चांगला मानला जातो. च्नागाला सिबिल स्कोर असेल तर, credit कार्ड पान मिळू शकते
3 CIBIL स्कोरचे फायदे काय आहेत? चांगला सिबिल स्कोर असेल तर कमी व्याजदरात कर्ज मिळते. credit कार्ड मिळण्यास अडचणीयेत नाहीत.
4 CIBIL स्कोअर वाढवण्यासाठी किती दिवस लागतात? सिबिल स्कोर वाढवण्यासाठी 4-12 महिण्याचा कालावधी लागतो.
SIP म्हणजे काय? sip कशी आणि किती गुंतवणूक करायची या लेखात:https://marathireader.com/sip-meaning-in-marathi-what-is-sip-benefits/
दिवाळी २०२४: यावर्षी कधी आहे दिवाळी आणि मुहूर्त:https://marathireader.com/diwali-2024-when-is-diwali-dipawali/#more-698