Shravan Somwar 2024: जाणून घ्या श्रावणी सोमवारचे महत्व व कोणत्या गोष्टी शिवलिंगाला अर्पण कराव्यात.

Shravan Somwar 2024:

Shravan Somwar 2024: भारतात सन व उत्सव यांना विशेष असे महत्व आहे. हिंदू पंचागनुसार प्रत्येक मराठी महिन्यात सण, उत्सव व व्रत येत असतात.

Shravan Somwar 2024
credit-photosNow.net

हे सर्व सण, उत्सव साजरे करण्यामागे काही शास्त्रीय कारणे देखील आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणारे सण, उत्सव हे महत्त्वाचे आहेत. पंचागनुसार श्रावण हा पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण या नक्षत्रात असतो. त्यामुळे या महिन्याला श्रावण महिना म्हणतात. श्रावण महिना हा सर्वांना प्रचलित व महत्त्वाचा असा महिना आहे. श्रावण महिन्यात देवांचे देव महादेव व देवी पार्वतीची पूजा केली जाते. चातुर्मास सुरू झाल्यानंतर वेद लागतात श्रावणाचे. श्रावणात प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. त्यापैकी महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार (shravan somwar). 

श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे. श्रावण महिना निसर्ग रम्य वातावरणासाठी ओळखला जातो. यावर्षी महाराष्ट्रात पवित्र श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होत असून तो 3 सप्टेंबरपर्यंत आहे. भगवान शंकरांना खूप प्रिय असणारा महिना म्हणजे श्रावण महिना. या काळात शंकराची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषता सोमवारी केलेली पूजा व व्रताचे फळ तात्काळ मिळते अशीहि मान्यता आहे. भगवान शंकर व माता पार्वती यांची पूजा एकत्र केल्याने तिला सौभाग्य लाभते व तिच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात असेही म्हटले जाते. भगवान शंकरांना श्रावण प्रिय असण्याचे कारण म्हणजे याच महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते असे सांगितले जाते. 

शिवपूजनामध्ये जलअभिषेक, रुद्राभिषेक यांना विशेष महत्त्व आहे. शिवपूजन शक्य नसल्यास बेलाचे पान वाहिल्यास पूर्ण पुण्य प्राप्त होते असेही म्हटले गेले आहे.

भगवान शंकरांना श्रावण प्रिय असण्याची पौराणिक कथा

माता सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योग शक्तीने शरीराचा त्याग केला. त्या आधी प्रत्येक जन्मात भगवान शंकरांना मिळण्याचा पण केला होता. देवी सतीने दुसऱ्या जन्मात राजा हिमालय व मैनावती यांच्या घरी जन्म घेऊन पार्वती असे नाव धारण केले. निराहार राहून कठोर व्रत करून महादेवांना प्रसन्न  केले आणि त्यांच्याशी विवाह केला त्यामुळेच महादेवांना श्रावण प्रिय आहे.

श्रावणी सोमवारचे व्रत कसे करावे?

Shravan somwar 2024: श्रावणी सोमवारच्या व्रताचे विशेष अनुभव भक्तांना येत असतात. श्रावण सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा व तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी रात्री भोजन करून उपवास सोडावा. पूजे आधी व्रताचा संकल्प करावा त्यानंतर भगवान शंकराचे मनोभावे ध्यान करावे. या श्रावणाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यावर्षी श्रावण महिन्यात एकूण पाच सोमवार येत आहेत आणि हा योग पंधरा वर्षाच्या नंतर आलेला आहे. त्यामुळे यावर्षीचा श्रावण महिना हा खूप शुभ मानला जात आहे.

शिवामूठ अर्पण करण्याचे महत्त्व:

Shravan somwar 2024: सौभाग्यवती व नवीन लग्न झालेल्या महिला यांनी सलग पाच वर्षे शिवामूठ महादेवाला अर्पण केल्याने किंवा हे व्रत केल्याने त्यांना चांगला लाभ होतो अशी मान्यता आहे. शिवामूठ अर्पनासाठी प्रत्येक सोमवारी वेगवेगळी धान्य वापरली जातात. चला तर मग कोणते धान्य कोणत्या सोमवारी शिवामूठ साठी अर्पण करावे ते पाहूया.

Shravan Somwar 2024
source-Internet
  • 05 ऑगस्ट 2024, पहिला श्रावण सोमवार – तांदूळ
  • 12 ऑगस्ट 2024, दुसरा श्रावण सोमवार – तीळ
  • 19 ऑगस्ट 2024, तिसरा श्रावण सोमवार – मुग
  • 26 ऑगस्ट 2024, चौथा श्रावण सोमवार – जवस
  • 02 सप्टेंबर 2024, पाचवा श्रावण सोमवार – सातू

  या पाच धान्यांची शिवामूठ पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या सोमवारी दिलेल्या क्रमानुसार शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे याचा चांगला लाभ मिळू शकतो. शिवामूठ अर्पण करताना खालील मंत्र म्हणावा.

“शिवा शिवा महादेवा,

माझी शिवामुठ ईश्वरा देवा’.

श्रावण महिन्यात शिवलिंगाला अर्पण केल्या जाणाऱ्या काही गोष्टी:

Shravan Somwar 2024
source-internet
  • बेल
  • धोतऱ्याचे फुल
  • दही
  • अत्तर
  • पाणी
  • चंदन
  • मध
  • तूप
  • केशर

या वरील दिलेल्या गोष्टी श्रावण महिन्यातील सोमवारी आणि महिन्याभरात शिवलिंगावर अर्पण केल्यास भगवान शंकर प्रसन्न होऊन मनातील इच्छा पूर्ण होतात, आरोग्य सुधारते, वाईट गोष्टींचा शेवट होतो व संकटे जीवनातील दूर होतात, मानसिक शांती लाभते व मानसन्मान वाढतो आणि कामात यश मिळते असे म्हटले जाते.

12 ज्योतिर्लिंगाची नावे व त्यांची प्रसिद्ध ठिकाणे:

अ. क्र.ज्योतीर्लीगाची नावेठिकाण
सोमनाथ सौराष्ट्र, गुजरात
मल्लिकार्जुनआंध्रप्रदेश
महाकालेश्वरउज्जैन, मध्यप्रदेश
ओंकारेश्वरखंडवा, मध्यप्रदेश
केदारनाथकेदारनाथ, उत्तराखंड
भीमाशंकरपुणे, महाराष्ट्र
काशी विश्वनाथ वाराणसी, उत्तर प्रदेश
 त्रिंबकेश्वर  नाशिक, महाराष्ट्र
वैद्यनाथ  देवघर, झारखंड
१०नागेश्वर  द्वारकापुरम, गुजरात
११रामेश्वर  रामेश्वरम, तमिळनाडू
१२घृष्णेश्वर औरंगाबाद, महाराष्ट्र
Shravan somwar 2024

महादेवाची अनेक नावे:

अ. क्र.महादेवाची नावेअ. क्र.महादेवाची नावेअ. क्र.महादेवाची नावे
शिवशंभु१८अमोघ ३५खंडोबा
उमापती१९अरिदम ३६उमाकांत
भोलेनाथ२०अरिष्ट३७उमानाथ
उमेश २१अंबरीश ३८भद्र
गंगाधर२२अंडधर ३९पशुपतिनाथ
त्रिनेत्र२३अकंप ४०बैजनाथ
7 त्र्यंबक२४शारंगपाणि४१ निरंजन
नीलकंठ२५अक्षमाली४२नीलकंठ
महेश२६ अघोर ४३नीरज
१०रुद्र२७अचलेश्वर ४४ परमेश्वर
११शंकर२८  अज्ञय  ४५विश्वनाथ
१२शंभू२९अतींद्रिय ४६विश्वेश्वर
१३शूलपाणि३०अनिरुद्ध४७महारुद्र
१४सदाशिव३१अजातारी४८महार्णव
१५सांब३२कालभैरव ४९महालिंग
१६ गौरीहर३३काशिनाथ ५०महेश
१७दीनानाथ३४भालचंद्र५१महेश्वर

funny marathi ukhane वाचण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा https://marathireader.com/funny-marathi-ukhane-for-male-and-female/#more-256

anniversary wishes for couple in marathi साठी क्लिक कराhttps://marathireader.com/marriage-anniversary-wishes-in-marathi/#more-280

गुरुपौर्णीमेविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कराhttps://marathireader.com/gurupurnima-wishes-in-marathi/#more-234