Marriage Anniversary wishes in Marathi|लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा!

Marriage Anniversary wishes in Marathi: लग्न म्हणजे दोन जीवांच्या अतूट बंधनाचा अनमोल क्षण. पती-पत्नी या दोघांच्या आयुष्यातील महत्वाचा व आनंदाचा दिवस म्हणजे लग्नाचा वाढदिवस.

Marriage Anniversary wishes in Marathi

एक चांगला जोडीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जातात. असा क्षण आयुष्यात आल्यानंतर त्याला कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी तो प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. या दिवशी कुटुंबातील सदस्य,नातेवाईक,मित्र-मैत्रिणी आणि पती-पत्नी देखील एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे आठवणीना उजाळा मिळून तो क्षण अविस्मरणीय होत असतो व पती-पत्नी यांच्यातील नाते आणखीनच बहरते. अशा या क्षणाचे औचित्य साधून जोडीदाराला किंवा प्रियजनांना संदेशस्वरूपात शुभेच्छा व आशीर्वाद दिले जातात. आपण हि त्यांच्या आनंदात सामील होऊन त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस सुंदर बनवूयात. चला तर मग आम्ही तुमच्यासाठी असेच काही सुंदर मेसेजेस, क्वोट्स, इमेजेस घेऊन आलो आहोत. आपल्या प्रियजनांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे संदेश पाठवू शकता.

Marriage Anniversary wishes in Marathi|लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |

Marriage Anniversary wishes in Marathi
credit-adobe stock

हा अनमोल दिवस तुमच्या दोघांच्या संसारात असंख्य आणि अगणित आनंद घेऊन येवो आणि

तुमच्या दोघांच्या आयुष्यात सुखाची उधळण निरंतर होत राहो, हीच आहे सदिच्छा..

अशाच लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….

तुमच्या सुंदर स्वभावाने संसाराला घरपण देणाऱ्या आणि

आयुष्याला स्वर्गाहून सुंदर बनविणाऱ्या तुमच्या जोडीला,

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

जसजसा काळ बदलतो तसतसे येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक,

तुमच्या दोघातील नवरा बायकोचे अतूट आणि साता जन्माचे नाते अधिक विश्वासाचे,

सुख-समृद्धीच्या, अखंड आभाळाएवढे अतूट आणि अखंड होत रहावे हीच आमची सदिच्छा आहे.

अशाच या लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमचे नाते असेच वर्षानुवर्षे फुलत रहावे आणि प्रेम सतत बहरत रहावे हीच सदिच्छा….

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

येणारी असंख्य वर्ष अशीच सुखाने व प्रेमाने बहरलेली जावो हीच कायम सदिच्छा …

Happy marriage anniversary….

तुमच्या नात्यात असाच कायम प्रेमाचा ओलावा रहावा,

दोघांनी एकमेकांची साथ देत असेच हसत खेळत आयुष्य जावो,

हेच देवाकडे मागणे

Happy marriage anniversary

नाती जन्मोजन्मीची, नाती प्रेमाची,

अशीच येणारी संकटे हसत पार करून,

तुमचा संसार फुलावा हीच सदिच्छा..

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

फुलांना जसे एक धागा गुफुंन एकत्र ठेवतो,

तसेच तुमचे प्रेमळ नाते दोघांना एकमेकांत बांधून ठेवो,

हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आजपर्यंत सुखाने केलेला संसार ,

असाच सुखाचा भरभराटीचा,समृद्धीचा जावो,

हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

पावसाळ्यात जशी झाडांना नवी पालवी फुटते,

तसेच तुमच्या नात्यात रोज नवेपण यावे,

जशी झाडे, वनस्पती पावसाळ्यात बहरतात,

तसेच तुमच्या दोघांचे प्रेम बहरावे,

याच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

येणाऱ्या प्रत्येक वर्षात तुमचे प्रेम अधिक दृढ होत रहावो,

अशा या तुमच्या जोडीला,

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

विश्वासार्थाने हे बंधन असेच घट्ट रहावो ,

तुमच्या आयुष्यात प्रेमाचा झरा असाच वहावो,

हीच प्रार्थना आहे देवाचरणी कि,

तुमचे आयुष्य सुख-समृद्धीने भरभरून जावो.

अशाच या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या दोघांचा संसार एका सुरेल संगीताप्रमाणे सुंदर आणि मनमोहक होत जावो आणि,

तुमच्या दोघांच्या नात्यातील ऋणानुबंध हे वर्षानुवर्षे अधिक प्रीतीचं विश्वासाचे होत रहावे,

हीच सदिच्छा…..

लग्नाच्या वाढदिवसाच्या आमच्याकडून शुभेच्छा….

यशस्वी संसाराच्या आणि भविष्याच्या उज्वल संधीसाठी,

परमेश्वराचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी रहावे,

हीच आहे प्रार्थना.

अशाच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या नात्यातील एकमेकांवर प्रेम हे अखंड वृद्धिगत होत जावो आणि तुमच्या दोघांचा संसार सोन्यासारखा अधिक मौल्यवान आणि तेजोमय होत रहावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्हा सर्वांकडून तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभ मंगलमय व प्रेमळ शुभेच्छा….

Happy Marriage anniversary..

आपला कधी न होवो जीवनात दुःखाशी सामना,

लग्न वाढदिवसाला देतो आम्ही हीच तुम्हाला शुभकामना….

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

लग्नाचा वाढदिवस असतो तुमचा, आम्हाला असते मार्गदर्शन,

तुमचे आदर्श असे वागणे आम्हाला असते दिशादर्शक,

तशाच या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

प्रेम आणि विश्वासाचे आहे पती-पत्नीचे हे पवित्र नाते,

तुमचे चेहऱ्यावरील हास्य सारे काही बोलुन जाते,

तुमचा लग्न वाढदिवस दरवर्षी असाच होऊ साजरा,

तुमच्या दोघांचा नेहमी असाच चेहरा राहो मस्त हसरा,

तुमची दोघांची असते साथ जीवनात प्रत्येक क्षणी,

तुम्ही खुश रहावे हेच असते माझ्या मनी...

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षणांच्या आठवणींचा दिवस...

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेमाचे असे नाते हे तुम्हा दोघांचा समंजसपणा,

हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,

एकमेकांची आपापसातील आपुलकी प्रेम नेहमी वाढत राहो,

अशी क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो...

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,

देवाकडे प्रार्थना आहे की आयुष्यात तुम्हाला वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळो,

याच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….

संसार रुपी प्रेमाच्या वेलीवर कधी फुलावे, तर कधी हसावे, बहरत जाते हे बंधन कधी कडू, तर कधी गोड, आठवणींचे घेत हे विसावे, कधी एकमेकांची साथ तर, कधी एकमेकांचा हात पकडून, पूर्ण झाले हे वर्ष, लग्नाच्या वाढदिवसाच्या आपणा दोघास लक्ष लक्ष शुभेच्छा….

तुमच्या दोघांच्या एकमेकांच्या प्रेमाची व बंधनाची साक्ष देते हे वर्ष, तुमच्या संसाराच्या अविस्मरणीय आठवणींचे गीत म्हणजे हे वर्ष, नवरा-बायको पासून आई-बाबा, काका-काकू, मामा-मामी अशी सर्व नात्यागोत्यांनी भरलेले वर्ष म्हणजे हे वर्ष, याच लग्नाच्या वाढदिवसाच्या आपणा दोघास लक्ष लक्ष शुभेच्छा….

समर्थपणाची दुसरी व्याख्या म्हणजे तुमचे नाते, विश्वासाची अनोखी कहानी म्हणजे तुमच्या दोघांचे नाते, अखंड गोड प्रेमाचे गोड उदाहरण म्हणजे तुमचे नाते, असाच तुमचा गोडवा कायम टिकून राहावा, याच तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा….

आत्तापर्यंत च्या …. व्या वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या अनेक चांगले वाईट क्षण सरुन गेले, पण तुमच्या दोघांमधील प्रेम आणि तुमच्या नात्यामधील ओढ ही मात्र दिवसेन-दिवस वाढतच आहे. अशीच रहावी तुमची एकमेकांची साथ, हीच आहे सदिच्छा श्री .. व सौ … तुम्हा दोघांना आमच्याकडून लग्न वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा….

आकाशात चमकतात चमचमणाऱ्या चांदण्या छान, नदीमध्ये पोहणारा राजहंस दिसतो किती छान, स्वर्गामधील शिवपार्वतीच्या जोडीचा सर्वांनाच आहे ध्यास, अशाच आपल्या परिवारातील मनमोहक जोडीला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून खास….

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या जोडी सारखी, तुमच्या दोघा नवरा बायकोची जोडी अखंड युगानुयुगे एकत्र व चिरंतर रहावी हेच साकडे विठू माऊलीला. याच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

मनमोहक संगीत म्हणजे श्रीकृष्ण, सूर म्हणजे राधा, बासरी म्हणजे श्रीकृष्ण, तर बासरीचा ध्वनी आणि ताल म्हणजे राधा, सुरुवात म्हणजे श्रीकृष्ण, अंत म्हणजे राधा, अशा राधा कृष्णाच्या जोडी सारखे तुम्हा दोघांचे प्रेम आणि विश्वास अतूट होत राहो, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना याच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

शिवपार्वती सारखी जोडी तुम्हा दोघांची असावी, जिथे अपेक्षा कमी आणि प्रेम मात्र भरभरून असावे, याच लग्न वाढदिवसाच्या आपणास मंगलमय शुभेच्छा…..

जन्मोजन्मी फुलत आणि बहरत राहो तुम्हा दोघांचा संसार, नात्यातील प्रेम आणि नात्या मधील प्रेम. हीच आहे सदिच्छा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Marathi ukhane in marathi वाचण्यासाठी यावर क्लिक कराhttps://marathireader.com/wp-admin/post.php?post=256&action=edit

Marriage anniversary wishes in marathi for DADA and VAHINI:

प्रिय दादा आणि वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून आनंदी शुभेच्छा….

हे अतूट नाते प्रेमाचे, एका सुंदर नात्यात विणलेले, विवाह संसार, कर्तव्य आणि जबाबदारीच्या वृक्षाने बहरलेला. असाच सात जन्मी आनंदाने आणि गोडीने नांदो तुमच्या दोघांचा संसार, हीच आहे सदिच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या दादा व वहिनीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा….

कसे गेले हे वर्ष हे आम्हालाही समजलेच नाही, सगळे म्हणतात लग्न झाले की प्रत्येक व्यक्ती बदलते पण हा नियम तुमच्या दोघांना कधीच लागू पडला नाही, दादा आणि वहिनी तुमच्या दोघांचा गोड संसार असाच वर्षानुवर्ष फुलत जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. याच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

नाते हे शत जन्माचे, आपुलकी, माया आणि ममतेचे. एकमेकांवरील अतूट विश्वास आणि समजूतदारपणा हीच गुपित तुमच्या आनंदी संसाराचे. याच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या सुंदर संसारावर सात जन्मी अखंड राहो हीच आहे आमची मनोकामना. याच लग्नाच्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा….