श्री गणपती आरती संग्रह: गणेश उपासनेत म्हटल्या जाणाऱ्या सर्व पारंपारिक श्री गणपती आरत्यांचा संग्रह येथे दिला आहे. ह्या गणेशोत्सवी आपल्या गणरायाचे स्वागत मंगलमय आरतीने करा. या आरत्यांचा गणेश उपासनेत समावेश करून मिळवा गणेशाची कृपा आणि आनंद
||श्री गणपती आरती (Shree Ganpati Aarati) ||
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ||
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळांची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || धृ ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ||
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपूरे चरणी घागरिया || २ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || धृ ||
लंबोदर पीतांबर फणीवरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना || ३ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || धृ ||
श्री विठ्ठलाची आरती १
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
श्री विठ्ठल आरती २
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु.. ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई.. ॥ १ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई.. ॥ २ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो.. ॥ ३ ॥
भगवान शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु.. ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव.. ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव.. ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव.. ॥ ४ ॥
दुर्गा देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ जय देवी.. ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ जय देवी..॥ ३ ॥
दत्ताची आरती
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥
पराही परतली तेथे कैचा हा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
संत ज्ञानेश्वरांची आरती
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||
लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |
नाम ठेविलें ज्ञानी || १ ||
कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही |
साम गायन करी || २ ||
प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा जनार्दनी |
पायीं मस्तक ठेविलें || ३ ||
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||
संत तुकाराम आरती
आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||
राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले || १ ||
तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || २ ||
श्री सत्यनारायण आरती
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा
पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा || धृ ||
युक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥
परिमल द्रवरूप पुष्पमाळा अर्पून ॥
घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥
प्रसाद भक्षणासाठी तू त्या प्रसन्ननारायण ॥ 1 ॥
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ॥
शतांदे विप्रें पूर्वी व्रत हेन आचरिलें ॥
दरिद्र दवडुनि अंती ते मोक्षपदा नेलें ॥
त्यापासुनि हेन व्रत या कलियुगीं सकळां श्रुतंदें ॥
भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ 2 ॥
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ॥
साधुवैश्ये संततिसाठीं तुजला प्रार्थिलें ॥
इच्छित पुरता मदांध विवरण व्रत न आचरिलें ॥
त्या पापानें संकटीं पडुनि दुःख भोगीलें ॥
स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्धरिले ॥ 3 ॥
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ॥
प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती ॥
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥
अंगध्वजरासी यापरि दुःखस्थिती आली ॥
मृत वार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसीली ॥ 4 ॥
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ॥
पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण तत्क्षणी ॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्जरायासी पुत्र भेटिवहि ॥
तू भक्तां संकटीं पावसी तू चक्रपाणी ॥ 5 ॥
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा
अनन्यभावे पूजुनि हे व्रत जेजन आचरती ॥
इच्छित पुरविसि शें देउनि संतति ॥
संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥ 6 ॥
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा
तो तव्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा ॥
भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा ॥
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ 7 ॥
जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा ॥
घालिन लोटांगण आरती
घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।
त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा |
बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात |
करोमि यध्य्त सकलं परस्मे|
नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं |
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं |
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।
हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
मंत्र पुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा: ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मनोकामान् काम कामाय मह्यं ।
कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात्
पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराडिति
तदप्येषः श्लोको भगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।
आमचा श्री गणपती आरती संग्रह: गणेश उपासनेतील सर्व आरत्या|Ganpati Aarati हा ब्लोग कसा वाटला याबद्दल चा अभिप्राय आम्हाला कमेंट बोक्स मध्ये कमेंट लिहून कळवा.
श्री हनुमान चालीसा मराठीत वाचण्यासाठी यावर क्लीक करा: https://marathireader.com/hanuman-chalisa-lyrics-marathi/#more-573
रामरक्षास्तोत्रम् मराठीत वाचण्यासाठी यावर क्लीक करा: https://marathireader.com/ram-raksha-stotra-marathi-lyrics/#more-591
श्री गणपती आरती मराठीत वाचण्यासाठी यावर क्लीक करा: https://marathireader.com/shree-ganpati-aarati-marathi-lyrics/#more-602
Morning Quotes Marathi वाचण्यासाठी यावर क्लिक करा: https://marathireader.com/good-morning-quotes-marathi-shubh-sakal/#more-553